‘ष’ हे अक्षर बाराखडीतून गायब होईल ह्या भीतीपोटी स्वत:च्या नावात त्याचा उपयोग करणारा दूरदर्शी सच्चा मराठी कलाकार!
षांताराम पवार एक रांगडं, विक्षिप्त, मराठमोळं असं विलक्षण व्यक्तिमत्त्व. अक्षरांवर प्रेम करणारा अक्षरप्रेमी. साहित्य आणि कला यातला उत्तम जाणकार. हुशार आणि बुद्धिमान आणि आपण तसे आहोत याची पुरेपूर जाण असलेला माणूस. तानाजी मालुसऱ्यांनी यवनांचा तलवारीनं जेवडा रक्तपात केला नसेल, त्याहूनही जास्त लोकांचा शाब्दिक रक्तपात ह्या एकमेव मराठ्यानं केला. असं हे विलक्षण व्यक्तिमत्त्व!.......